

परभणी, दि.१ २ मार्च : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी मार्फत रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या वतीने अरबिंदो अक्षरज्योती शाळा, पाथरी रोड, परभणी येथे संपन्न झाला. या उपक्रमाला प्रेरणास्थान म्हणून प्राचार्य डॉ. गणेश जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन अरबिंदो अक्षरज्योती शाळेच्या प्राचार्या शशी अय्यर मॅडम यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. अविनाश चोंडे सर, मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) परभणी उपस्थित होते. तसेच जीवनदूत संस्थेचे अध्यक्ष पठाण मोहसीन खान आणि शेख आयुब यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करणे, हेल्मेटचा वापर करणे आणि सुरक्षित वाहनचालना करण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. व लहान मुलांना संदेश दिला कि आपण आपल्या आई बाबा आणि भाऊ बहीण असे जे कोणी वाहन चालवतात त्यांना हेल्मेट वापरा , वेग मर्यादा ओलांडू नका , मद्यपान करून वाहन चालावे नका असे सांगितले. मोबाईल टॉकिंग, झेब्रा कॉसिंग, गुड समिरेटन अशा विविध बाबीत विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचा आधार घेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या उपक्रमात स्वयंसेवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अशा जनजागृती उपक्रमांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



