वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना खिचडी वाटपजिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे सामाजिक उपक्रम

परभणी, दि.02-03-2026 :
सौ. भाग्यश्री गणेश जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवत जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप केले.

या उपक्रमाचे आयोजक शेख आयुब आतार यांनी केले असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. रुग्णालयातील अनेक गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

सौ. भाग्यश्री गणेश जोशी या शिक्षिका असून डॉ. गणेश जोशी (प्राचार्य व आवृत्ती संपादक, दैनिक लोकपत्र, नांदेड) यांच्या पत्नी आहेत. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करून त्यांनी समाजात आपुलकी व जिव्हाळ्याचा संदेश दिला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे सामाजिक कार्य सतत राबविले जावे, असे मत व्यक्त केले. समाजात वाढत्या सामाजिक जाणिवेसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *