परभणीत रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद; ब्लॅक स्पॉटवर गवत काढण्याची सुरु मोहीम केली

परभणी, दि.० १ .० ३ .२ ० २ ६ _ :
परभणी जिल्ह्यात वाढत्या रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यालगत गवत व झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दृष्टीआड होणारे वळणांचे भाग ‘ब्लॅक स्पॉट’ बनले असून तेथे वारंवार अपघात घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत ब्रश कटर मशीनच्या साहाय्याने धोकादायक ठिकाणी गवत काढण्याची आणि रस्त्यावरील वळणांवर तसेच डिव्हायडरवर रेडियम स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

प्रेरणास्थान: प्राचार्य डॉ. गणेश जोशी सर (आवृत्ती संपादक, दैनिक लोकपत्र, नांदेड)
आयोजक: शेख आयुब
संस्थापक अध्यक्ष: मोहसीन खान

उमरी फाटा येथील धोकादायक वळणावर वाढलेली झाडे-झुडपे मशीनच्या सहाय्याने कापण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना वळण स्पष्ट दिसू लागले असून अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करत हेल्मेट वापर, सीटबेल्ट बांधणे, वेग मर्यादा पाळणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनानेही ब्लॅक स्पॉट ओळखून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश परिषदेतून देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *