Jeevandoot Charitable Trust Parbhani

Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

Translate This Website

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

परभणी येथे रस्ता सुरक्षेसाठी अनोखा उपक्रम

परभणी, दि. २ १ फेब्रुवारी २ ० २ ६ :
रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती परिषदेअंतर्गत एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लोकसहभागातून ब्रश कटर मशीन खरेदी करून रस्त्यालगत वाढलेले गवत व झाडे हटविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे .

रस्त्यावरील ब्लॅंक स्पॉट (धोकादायक ठिकाणे) येथे मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या गवत व झुडपांमुळे वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टच्या वॉलंटिअर्समार्फत अशा ठिकाणी गवत कापून रस्ता मोकळा करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

रस्ते अपघात हा आज गंभीर आणि वाढता सामाजिक प्रश्न बनला आहे. निष्काळजीपणा शासनाचा असो किंवा प्रशासनाचा, त्याचा बळी मात्र निष्पाप नागरिक ठरतात. या पार्श्वभूमीवर भारतात प्रथमच असा लोकसहभागातून राबविण्यात येणारा उपक्रम परभणी येथे सुरू करण्यात आल्याचा दावा ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे.

यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी युवक वर्गाला विशेष आवाहन केले आहे की, रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेत पुढाकार घ्यावा. आपला अमूल्य वेळ, श्रमदान व देणगी देऊन या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *