Jeevandoot Charitable Trust Parbhani

Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

Translate This Website

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

परभणीत जिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात

परभणी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ — परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे आज खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परभणीतील भारतभर प्रसिद्ध असलेल्या हजरत सय्यद शाह तूराबुल हक रहे. उर्स १ १ ९ साजरी करण्यात (११९ वा स्मृतिदिन) निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा उपक्रम जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या वतीने राबविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. गणेश जोशी (आवृत्ती संपादक, दैनिक लोकपत्र तथा जिल्हाध्यक्ष, वाईस ऑफ मीडिया, नांदेड) हे होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री जोशी ( एमजीएम महाविद्यालय, परभणी ) यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत खिचडी वाटप केले.

रुग्णालयातील रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रभारी शेख आयुब आतार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.

यावेळी जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आणि आयोजकांच्या सहकार्याने रुग्णालयातील शेकडो गरजू नागरिकांना गरम व पौष्टिक खिचडीचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प #viralvideoシ आयोजकांनी यावेळी व्यक्त केले Road Safety Awareness CouncilMohsin Khan ayub shaikh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *