Jeevandoot Charitable Trust Parbhani

Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

Translate This Website

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टला ‘रस्ता सुरक्षा 2026’ पुरस्काराने गौरव

परभणी (प्रतिनिधी) – रस्ता सुरक्षेसाठी उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी केल्याबद्दल जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टला ‘रस्ता सुरक्षा 2026’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार परभणी येथील Shivaji Engineering College Auditorium येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

ट्रस्टमार्फत रस्ता सुरक्षा क्षेत्रात विविध ठिकाणी प्रत्यक्ष काम करण्यात आले. ट्रस्ट चे मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ . गणेश जोशी आवृत्ती संपादक दैनिक लोकपत्र नांदेड हे लाभले . गंगाखेड रोडवरील सायाळ-सुनेगाव टर्निंग पॉईंट, उमरी फाटा तसेच पाथरी रोडवरील धोकादायक वळणांवरील झाडे-झुडपे काढून रस्ते सुरक्षित करण्यात आले. याशिवाय परभणी जिल्ह्यातील विसावा कॉर्नर ते राधिका पॅलेस आणि राधिका पॅलेस ते नवा मोंढा या परिसरातील विद्युत खांबांवर रेडियम लावून अपघात टाळण्यास मोठी मदत झाली. या उपक्रमांमुळे अनेक नागरिकांचे जीव वाचण्यास हातभार लागल्याचे सांगितले गेले.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान (एम.जे.एम.एस) आणि प्रदेशाध्यक्ष शेख आयुब शेख रशीद आतार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ साहेब (IPS)यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे, मंगेश पाचपुते तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे उपस्थित होते.

हा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच सेवा निवृत्त अधिकारी डॉ. खोडवे सर , पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा दंतुलवार सर आणि शिवाजी इंजिनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य पाथरीकर सर व शिक्षकवृंद यांचेही मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले.

रस्ता सुरक्षा हा जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टचा आजीवन ध्येय असून, भविष्यातही ट्रस्टमार्फत रस्ता सुरक्षेसाठी सातत्याने काम केले जाणार आहे, अशी भावना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे जीव वाचवणे हा ट्रस्टचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रस्ता सुरक्षा जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजहित साधणाऱ्या जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *