Jeevandoot Charitable Trust Parbhani

Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

Translate This Website

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

jeevandoot

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

🪔

आनंदाची दिवाळी – सर्वांसाठी दिवाळी

“दिवाळीचा आनंद फक्त दिव्यांमध्ये नाही, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आहे.” 🌼

🪔 जीवनदूत फाऊंडेशनतर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन🪔

परभणी, २९ ऑक्टोबर २०२५ – समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आनंदाची दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने जीवनदूत फाऊंडेशनतर्फे आज “दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम” सावली बेघर निवारा केंद्र परभणी येथे आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात स्वयंसेवक आणि विश्वस्त मंडळाने विविध वस्त्यांमध्ये जाऊन फराळाचे पाकीट वाटप केले. फराळात चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे आणि इतर पारंपरिक पदार्थांचा समावेश होता.

संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहसिन खान (एम जे मास मीडिया) यांनी सांगितले की, “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा, हीच आमची खरी दिवाळी.”

या कार्यक्रम वेळी बेघर निवारा केंद्राचे संचालक श्री युवराज गव्हाणे सर ,कार्यक्रमाचे आयोजक श्री आयुब शेख ,शोएब बेग उपस्थित होते

कार्यक्रमादरम्यान जेष्ठ नागरिकांत आनंदाचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनीही जीवनदूत फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

संस्थेच्या स्वयंसेवकांनी पुढील काळात अशा आणखी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *