Jeevandoot Charitable Trust Parbhani

News & Updates
रस्ता सुरक्षा जनजागृती कार्याबद्दल जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान यांचा पुरस्काराने गौरव Road Accident Black Spot Identification and Rectification: अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून रस्ते सुरक्षित करण्यावर भर; Road Engineering आणि Safety Improvements ठरणार महत्त्वाचे स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार देण्याचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम; सध्याच्या नियमांबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती हिट-अँड-रन अपघातातील पीडितांना मिळणार ₹२ लाखांपर्यंत नुकसानभरपाई; गंभीर दुखापतीसाठी ₹५० हजार, जाणून घ्या संपूर्ण योजना मोठी बातमी : महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्युंजय देवदूत’ ठरतात जीवनदूत (jeevandoot)! जाणून घ्या या उपक्रमाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र में सड़क दुर्घटना पीड़ितों के लिए मददगार बने Mrityunjay Devdoot! जानिए इस पहल की पूरी जानकारी
Site Logo

Jeevandoot Charitable Trust Parbhani

रस्ते अपघात, अर्थिक फसवणूक, नशामुक्ती आणि
पर्यावरण जनजागृती वर केंद्रित

Translate This Website

पाथरी रोड परिसरातील ब्लाइंड स्पॉटवर झुडपे कापून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम

परभणी, दि.१ २ मार्च : पाथरी रोड परिसरातील काही ठिकाणी टर्निंग पॉईंटवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या व झुडपांमुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर जीवनदूत फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने ब्लाइंड स्पॉट असलेल्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षितता उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे सर यांनी प्रत्यक्ष स्थळी ब्लाइंड स्पॉट दाखवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या टर्निंग पॉईंटवरील झाडांची झुडपे, लहान फांद्या आणि वाढलेले गवत ब्रश कटर मशीनच्या साहाय्याने कापून काढण्यात आले, ज्यामुळे वाहनचालकांना रस्ता अधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे.

रस्ते अपघातांची संख्या शून्यावर आणण्याच्या उद्देशाने जीवनदूत फाउंडेशन हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. नागरिकांनी देखील अशा उपक्रमात सहभागी व्हावे आणि ज्या ठिकाणी टर्निंग पॉईंट किंवा रस्त्यालगत झाडे-झुडपे वाढून अपघाताचा धोका निर्माण होत असेल, त्या ठिकाणाची माहिती फाउंडेशनला द्यावी, असे आवाहन करण्यात आले. इच्छुक नागरिकांनी श्रमदान करून या मोहिमेत सहभागी होऊ शकतात, तसेच संस्थेकडून मशीनच्या साहाय्याने झुडपे कापून अपघात रोखण्यासाठी मदत केली जाईल.

या उपक्रमावेळी जीवनदूत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान व कार्याध्यक्ष शेख आयुब यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रस्ते सुरक्षित करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *